![]() |
| वाढदिवसालाच मित्रांनी केली हत्या.. |
मुंबईत एका 20 वर्षीय युवकाची त्याच्या वाढदिवसालाच हत्या
करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चार मित्रांनीच हा खून केला आहे. नंतर 2
आरोपी अहमदाबादला पळून गेले होते. तिथेच त्यांना अटक करण्यात आली. वाढदिवसाला
दिलेल्या पार्टीतील जेवणाचे पैसे मागण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. पोलिसांनी
ताब्यात घेतलेल्या चार आरोपींपैकी 2 आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांना बालसुधारगृहात
पाठवण्यात आले आहे.

