१० वी च्या विद्यार्थीनां रु १५०००/- तर १२ वी च्या विद्यार्थीनां रु २५०००/- मिळणार.
![]() |
| १० वी, १२ वी पास झालेल्यांना पैसे मिळणार |
पुणे महानगरपालिका अंतर्गत भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद योजना आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेंतर्गत १० वी आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य पुरवते. विद्यार्थ्यांनी dbt.punecorporation.org वर ऑनलाइन अर्ज भरावा आणि भरलेल्या अर्जाची प्रिंट-आउट सबमिट करावी. आवश्यक मूळ कागदपत्रे स्कॅन करून सोबत अपलोड करावीत.
काय आहेत योजना ?
या वर्षी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) किंवा कोणत्याही समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पुण्यातील कोणत्याही विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती मिळेल. आपल्या भारताचे भारतरत्न डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजने अंतर्गत रु १५,०००/-मिळणार.
तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजनेतून प्रत्येकाला शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) किंवा कोणत्याही समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रु २५,०००/-मिळणार.
या योजनांसाठी कोण अर्ज करू शकतो?
-पास होणार विद्यार्थी हा पुणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील शाळेतील असावा.
- विद्यार्थ्याने चालू वर्षात SSC किंवा HSC परीक्षेत किमान ८०% गुण मिळवलेले असावेत.
- विद्यार्थी मागास प्रवर्गातील असल्यास किंवा पुणे महानगरपालिकेच्या नियमित/रात्रीच्या शाळेत शिकत असल्यास, त्याने/तिने किमान ७०% प्राप्त करणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी ४०% अपंग असल्यास, किमान टक्केवारी ६५% असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याने आपल्या पुढील शिक्षणासाठी मान्यताप्राप्त संस्थेत अॅडमिशन अर्ज केलेला असावा.


👍
ReplyDelete😊
ReplyDeleteKhup Chan mahiti
ReplyDeleteHo me kela majya mulansathi apply
ReplyDeleteMi pan kela aahe apply . thnk you tuchamule hi mhiti mazaparent pochli
ReplyDeleteplz forward this information to needy students . this maybe help them.
ReplyDelete