| आंदोलन मागे घेतल्याची अफवा... |
कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण
सिंह यांच्याविरोधात सुरु असलेले आंदोलन मागे घेतले, असे वृत्त आज झळकले. त्यानंतर कुस्तीपटूंनी
समोर येत हे खोटे असल्याचे स्पष्ट केले. आंदोलन मागे घेतल्याचे वृत्त अफवा आहे, अशा
बातम्या आम्हाला नुकसान पोहोचवण्यासाठी पसरवल्या जात आहेत, आम्ही
मागे हटणार नाही, आंदोलनही
मागे घेणार नाही, महिला
कुस्तीपटूंनी एफआयआर मागे घेतल्याच्या बातम्याही खोटे आहे, असे बजरंग
पुनियाने सांगितले.
