विमान कोसळून चौघांचा मृत्यू..
![]() |
| विमान कोसळून चौघांचा मृत्यू |
विमान कोसळून चौघांचा मृत्यू अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये
एक विमान कोसळले आहे. या विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हे
संशयास्पद विमान वॉशिंग्टनच्या आकाशात घिरट्या घालत होते. यामुळे सुरक्षेच्या
कारणास्तव अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी त्याचा पाठलाग केला. तेव्हा हे विमान
अनियंत्रित झाले आणि जमिनीवर कोसळले. जोपर्यंत पोलीस पोहोचले तोवर विमानातील
कोणीही जिवंत नव्हते, याची चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

