(RBI) आरबीआयच्या घोषणेनंतर बाजारात घसरण.
![]() |
| शेर मार्केट मध्ये मोठी घसरण... |
आरबीआयच्या घोषणेनंतर आज मुंबई शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 294 अंशांनी घसरुन 62,848 अंशांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी 91.85 अंशांच्या घसरणीसह 18,634 अंशांवर बंद झाला आहे. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ नोंदवण्यात आली होती. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी पतधोरण जाहीर केले. यावेळी रेपो रेट कायम ठेवण्यात आला. सध्या रेपो रेट 6.50% आहे.

