Type Here to Get Search Results !

Top 10 schools in the world : जगातील टॉप 10 स्कूलमध्ये महाराष्ट्रातल्या 'या' 3 शाळांचा समावेश

 

Top 10 schools in the world
Top 10 schools in the world 

२०२३ चे जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षी भारताच्या पाच शाळांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. यामध्ये  महाराष्ट्र, दिल्ली,आणि गुजरातमधील शाळांचा देखील समावेश आहे.या यादीत महाराष्ट्रातील ३ शाळांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कारच्या माध्यमातून या शाळांना तब्बल अडीच लाख डॉलरचे बक्षिस दिले जाते. हा पुरस्कार समाजाच्या प्रगतीमध्ये शाळांचे किती योगदान आहे यावरून दिला जातो.

जगातील टॉप १० स्कूलमध्ये 'या' भारतीय शाळांचा समावेश पुरस्कार मिळालेल्या शाळांमध्ये महाराष्ट्र,दिल्ली, आणि गुजरातमधील देखील शाळांचा समावेश आहे. यात मुंबईतील आणि अहमदनगर जिल्ह्यातील शाळेचा समावेश आहे. दिल्लीतील सरकारी स्कूल नगर निगम प्रतिभा बालिका विद्यालय (NPBV) F-Block दिलशाद कॉलनी तसेच या वर्गात मुंबईतील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलचा देखील समावेश आहे. ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल ही खासगी आंतरराष्ट्रीय शाळा आहे.

गुजरातमधील रिव्हरसाइड स्कूल,(अहमदाबाद) ही देखील एक खासगी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. तर ' स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, (महाराष्ट्र) ही अहमदनगरमधील एक धर्मादाय शाळा आहे.'स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, (महाराष्ट्र) या शाळेमध्ये HIV/AIDS ग्रस्त मुलांना तसेच सेक्स वर्कर कुटुंबातील मुलांना शिक्षण देऊन त्यांचे जीवन बदलण्याचे मोठे काम केले जाते. पाचवी शाळा ही मुंबईतील दादरमधील आहे. दादरमधील शिंदेवाडी मुंबई पब्लिक स्कूल. (द आकांक्षा फाउंडेशन), ही शाळा मुंबईतील एक चार्टर स्कूल आहे.

Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Jay महाराष्ट्र

    ReplyDelete
  2. जय महाराष्ट्र

    ReplyDelete
  3. maharashtra always top

    ReplyDelete