Type Here to Get Search Results !

५०% गाय - म्हैस वाटप अनुदान योजना २०२३-२४ | Animal husbandry Scheme government of Maharashtra 2023-24

पशुसंवर्धन विभागातर्फे ५०% गाय - म्हैस वाटप अनुदान योजना २०२३-२४ 

पशुसंवर्धन विभाग योजना २०२३-२०२४ | Animal husbandry Scheme government of Maharashtra
पशुसंवर्धन विभाग योजना २०२३-२०२४ | Animal husbandry Scheme government of Maharashtra

पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणा-या शासकिय योजनांअंतर्गत सन २०२३ २४ ते सन २०२५-२६ या वर्षाकरिता पुणे, सांगली, सोलापुर व कोल्हापुर या जिल्हयासाठी दुधाळ जनावरे (गायी म्हशींचा) पुरवठा करावयाची आहेत. यासाठी पुरवठादारांचे जिल्हानिहाय पॅनेल तयार करण्यात येत असुन इच्छुक पुरवठादाराकडुन दि. ०८/०६/२०२३ ते दि. ०७/०७/२०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबतची सविस्तर माहिती विभागाचे संकेतस्थळ www.ahd.maharashtra.gov.in यावर तसेच, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पुणे, सांगली, सोलापुर व कोल्हापुर व निम्नस्वाक्षरीतांचे कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. दुधाळ जनावरे (गायी म्हशींचा) पुरवठा करणारे इच्छुक पात्र व्यक्ती, संस्था इ. यांनी विहित नमुन्यामध्ये पुणे, सांगली, सोलापुर व कोल्हापुर जिल्हयाच्या जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचेकडे अर्ज करावा.

अ) अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

१. सन २०१९-२०, सन २०२०-२१ आणि सन २०२१-२२ या कालावधीचे आयकर विवरणपत्र भरल्याचा पुरावा. 

२. पुरवठादार व्यक्ती / संस्था / कंपनी / फार्म यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या बाजारांचा परवाना.

३. खरेदी विक्रिच्या अनुभवाचे कागदपत्र व मागील तीन वर्षामध्ये किती दुधाळ जनावरांच्या (गायी म्हशींची) खरेदी / विक्री केली याबाबतची कागदपत्रे त्याबाबत कृषि उत्पन्न बाजार समितीचे खरेदी विक्रिचे अधिकृत आकडे सादर करावेत.

४. दर वर्षी किमान २५ लाखाचा खरेदी विक्रिचा व्यवहार केलेला असल्याचा पुरावा / दाखला सादर करणे आवश्यक आहे.

५. अर्जदाराचे पॅनकार्ड व आधारकार्ड.

ब) जिल्हयासाठी अंतिम निवड करण्यात आलेल्या दुधाळ जनावरांच्या पुरवठादारांचे जिल्हानिहाय पॅनेल तयार करण्यासाठी पुरवठादारांनी खालील विविध नमुद अटी व शतींचे पालन करणे व पुर्तता करणे आवश्यक राहील.

• जिल्हयासाठी अंतिम निवड करण्यात आलेल्या पूरवठादाराने रक्कम रू. ५००/- स्टॅम्प पेपरवर वर्ष कालावधी करिता करारनामा करणे आवश्यक आहे.

• पुरवठादाराने करारनामा करतेवेळी "Administrative Officer, Regionl Joint Commissioner of Animal Husbandry, Pune Division, Pune" यांचे नावे रु. ५.०० लक्ष रकमेचीवर्ष कालावधीसाठी बँक ग्यारंटी देणे आवश्यक आहे.

• पुरवठादारास लाभार्थ्याच्या पसंतीनुसार दुधाळ जनावरे खरेदी समिती सभासदांच्या उपस्थितीत विहित कालमर्यादेत दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे आवश्यक आहे. 

• पुरवठा केलेली दुधाळ जनावर (गायी- म्हैस) दुधातील व प्रजननक्षम असणे आवश्यक आहे.

• एखाद्या जिल्हयात नेमलेल्या पुरवठादार विहित कालमर्यादेत दुधाळ जनावरांचा पुरवठा केला नसल्यास अन्य जिल्हयातील पुरवठादाराकडुन दुधाळ जनावरांची खरेदी करण्यात येईल.

• दुधाळ जनावरांच्या खरेदीच्या वेळी बाजारामध्ये प्रत्यक्ष पुरवठादार उपस्थित राहणे बंधनकारक आहे. 

• पराराज्यातुन दुधाळ जनावरांची खरेदी करण्याची आवश्यकत्ता भासल्यास इतर राज्यातुन दुधाळ जनावरे आणण्याची व्यवस्था पुरवठादारास स्वःखर्चाने करावी लागेल.

• पुरवठादाराने विहित करण्यात आलेल्या कालावधीत दुधाळ जनावरे उपलब्ध करून न दिल्यास करारनामामध्ये

नमुद केलेनुसार दंड आकारण्याची कार्यवाही करण्यात यावी.

• दुधाळ जनावरांची खरेदी करताना केंद्र / राज्य शासनाचे सर्व कर अदा करण्याची जबाबदारी पुरवठादार याची राहील.

• दुधाळ जनावरांच्या खरेदी नंतर पुरवठादाराने बाजार पावती किंवा देयक हे प्रिंटेड स्वरूपाचे असणे आवश्यक आहे.

येथे करा अर्ज  www.ahd.maharashtra.gov.in 

Post a Comment

4 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Thank you .good information

    ReplyDelete
  2. this is very ineffective information for all the formers in maharashtra. sir content always good sir.

    ReplyDelete