पशुसंवर्धन विभागातर्फे ५०% गाय - म्हैस वाटप अनुदान योजना २०२३-२४
![]() |
| पशुसंवर्धन विभाग योजना २०२३-२०२४ | Animal husbandry Scheme government of Maharashtra |
पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणा-या शासकिय योजनांअंतर्गत सन २०२३ २४ ते सन २०२५-२६ या ३ वर्षाकरिता पुणे, सांगली, सोलापुर व कोल्हापुर या जिल्हयासाठी दुधाळ जनावरे (गायी म्हशींचा) पुरवठा करावयाची आहेत. यासाठी पुरवठादारांचे जिल्हानिहाय पॅनेल तयार करण्यात येत असुन इच्छुक पुरवठादाराकडुन दि. ०८/०६/२०२३ ते दि. ०७/०७/२०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबतची सविस्तर माहिती विभागाचे संकेतस्थळ www.ahd.maharashtra.gov.in यावर तसेच, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त पुणे, सांगली, सोलापुर व कोल्हापुर व निम्नस्वाक्षरीतांचे कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. दुधाळ जनावरे (गायी म्हशींचा) पुरवठा करणारे इच्छुक पात्र व्यक्ती, संस्था इ. यांनी विहित नमुन्यामध्ये पुणे, सांगली, सोलापुर व कोल्हापुर जिल्हयाच्या जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचेकडे अर्ज करावा.
अ) अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
१. सन २०१९-२०, सन २०२०-२१ आणि सन २०२१-२२ या कालावधीचे आयकर विवरणपत्र भरल्याचा पुरावा.
२. पुरवठादार व्यक्ती / संस्था / कंपनी / फार्म यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या बाजारांचा परवाना.
३. खरेदी विक्रिच्या अनुभवाचे कागदपत्र व मागील तीन वर्षामध्ये किती दुधाळ जनावरांच्या (गायी म्हशींची) खरेदी / विक्री केली याबाबतची कागदपत्रे त्याबाबत कृषि उत्पन्न बाजार समितीचे खरेदी विक्रिचे अधिकृत आकडे सादर करावेत.
४. दर वर्षी किमान २५ लाखाचा खरेदी विक्रिचा व्यवहार केलेला असल्याचा पुरावा / दाखला सादर करणे आवश्यक आहे.
५. अर्जदाराचे पॅनकार्ड व आधारकार्ड.
ब) जिल्हयासाठी अंतिम निवड करण्यात आलेल्या दुधाळ जनावरांच्या पुरवठादारांचे जिल्हानिहाय पॅनेल तयार करण्यासाठी पुरवठादारांनी खालील विविध नमुद अटी व शतींचे पालन करणे व पुर्तता करणे आवश्यक राहील.
• जिल्हयासाठी अंतिम निवड करण्यात आलेल्या पूरवठादाराने रक्कम रू. ५००/- स्टॅम्प पेपरवर ३ वर्ष कालावधी करिता करारनामा करणे आवश्यक आहे.
• पुरवठादाराने करारनामा करतेवेळी "Administrative Officer, Regionl Joint Commissioner of Animal Husbandry, Pune Division, Pune" यांचे नावे रु. ५.०० लक्ष रकमेची ३ वर्ष कालावधीसाठी बँक ग्यारंटी देणे आवश्यक आहे.
• पुरवठादारास लाभार्थ्याच्या पसंतीनुसार दुधाळ जनावरे खरेदी समिती सभासदांच्या उपस्थितीत विहित कालमर्यादेत दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे आवश्यक आहे.
• पुरवठा केलेली दुधाळ जनावर (गायी- म्हैस) दुधातील व प्रजननक्षम असणे आवश्यक आहे.
• एखाद्या जिल्हयात नेमलेल्या पुरवठादार विहित कालमर्यादेत दुधाळ जनावरांचा पुरवठा केला नसल्यास अन्य जिल्हयातील पुरवठादाराकडुन दुधाळ जनावरांची खरेदी करण्यात येईल.
• दुधाळ जनावरांच्या खरेदीच्या वेळी बाजारामध्ये प्रत्यक्ष पुरवठादार उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
• पराराज्यातुन दुधाळ जनावरांची खरेदी करण्याची आवश्यकत्ता भासल्यास इतर राज्यातुन दुधाळ जनावरे आणण्याची व्यवस्था पुरवठादारास स्वःखर्चाने करावी लागेल.
• पुरवठादाराने विहित करण्यात आलेल्या कालावधीत दुधाळ जनावरे उपलब्ध करून न दिल्यास करारनामामध्ये
नमुद केलेनुसार दंड आकारण्याची कार्यवाही करण्यात यावी.
• दुधाळ जनावरांची खरेदी करताना केंद्र / राज्य शासनाचे सर्व कर अदा करण्याची जबाबदारी पुरवठादार याची राहील.
• दुधाळ जनावरांच्या खरेदी नंतर पुरवठादाराने बाजार पावती किंवा देयक हे प्रिंटेड स्वरूपाचे असणे आवश्यक आहे.
येथे करा अर्ज www.ahd.maharashtra.gov.in


Thank you .good information
ReplyDeleteWelcome
DeleteThank you 😊
ReplyDeletethis is very ineffective information for all the formers in maharashtra. sir content always good sir.
ReplyDelete